03-11-2018 - 03-11-2018

शनिवारी 3 नोव्हेंबर, रोजी आपल्या क्लब मध्ये एक सुंदर कार्यक्रम झाला ।सर्वांचाच कायमस्वरूपी लाडका किशोरकुमार आणि त्याच्या आवाजाच्या सौंदर्याला झळाळी आणि नवचैतन्याबरोबर चिरतारुण्य बहाल करणारा देव आनंद असा दुग्धशर्करा योग आला होता । दोन सुंदर ललनांमध्ये एक संगीत साधक. नुसता मुनी नव्हे तर महामुनी. चंद्रशेखर महामुनी, समर्थपणे शोभला ! किशोरकुमार आणि देवआनंद यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद महामुनी यांच्या गाण्यातून मिळाला. त्यांना कल्याणी शेळके यांनी उत्तम साथ दिली. गाण्यांची उत्तम निवड आणि सादरीकरण यामुळे कार्यक्रम खूप रंगला.प्राजक्ता श्रावण यांचे निवेदनही साजेसेच होते .मल्लेश यांनी कुठलेही अस्तित्व न दाखवता सर्वाना कार्यक्रम ऐकू दिला !! कार्यक्रम जसा वेळेवर सुरू झाला तसाच वेळेवर संपला ।अप्रतिम कार्यक्रम दिल्याबद्दल कार्यक्रम समितीचे मनःपूर्वक अभिनंदन ।ही आनंदाची दिवाळी अशीच रेंगाळत राहो !!

Project Details

Start Date 03-11-2018
End Date 03-11-2018
Project Cost 52614
Rotary Volunteer Hours 25
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs -
Non Rotary Partners -
Project Category Others