GBD for budget approval and Jave Santanchya Gava

Meeting Details

Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 07:30:00
Location Arky Hall , Prabhat road
Meeting Type Club Assembly
Meeting Topic GBD for budget approval and Jave Santanchya Gava
Meeting Agenda Approval of the budget and speech by Chief Guest
Chief Guest Kirtankar Shreyas Badve
Club Members Present 25
Minutes of Meeting *"चला संतांच्या गावी"* रोटेरिअन रेश्मा कुलकर्णी पंढरीची वारी करील जो कोणी , त्याच्या मागेपुढे चक्रपाणी ।। सध्या पंढरी ची वारी चालू आहे. पंढरीची वारी म्हणजे 'मी पण गळून जाण्याचा सोहळा.' आणि अश्या सुसमयी दि. 8 जुलै रोजी सोमवारी, आपल्या क्लब मध्ये ह.भ.प. कीर्तनचंद्र श्रेयसजी बडवे आले होते. श्रेयसजी यांनी पुणे विद्यापीठाची एम.ए.संस्कृत पदवी तसेच पत्रकारीतेचिही पदवीका मिळवली. युवा भागवतकार तसेच रामायणकार म्हणून आज पर्यंत श्री क्षेत्र शुकताल (श्रीमद्भागवत कथन भूमी) येथे ६ वर्षे तसेच द्वारका ,वृंदावन, अशा अनेक पावन तीर्थक्षेत्री श्रीमद् भागवत कथन केले आहे. तसेच भगवान रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेली भूमी चित्रकूट येथे तरुणांसाठी रामकथा सादरिकरण केले आहे। श्रेयसजी वयाच्या आठव्या वर्षा पासून कीर्तन सेवेत आहेत. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण-घरीच वडील कीर्तनरंग मिलिंद बडवे यांचेकडे चालू आहे। तसेच करवीर पीठाधिश शंकराचार्य विद्याशंकरभारती यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले आहे। आज पर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर त्यांची ३००० वर कीर्तने झाली आहेत। उज्जैन येथे "कीर्तनचंद्र" ही पदवी ,"हरीकीर्तनोत्तेजक सभा पुणे" तर्फे युवा कीर्तनकार पुरस्कार, पुणे म.न.पा तर्फे बालगंधर्व पुरस्कार, गुणगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शाहिरी परीषदेचा कलागौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्र शासनातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग. आकाशवाणी व टी.व्ही.वर अनेक कीर्तनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. श्रेयशजींनी निरूपण करताना सांगितले की वारीचा प्रवास हा 280 किलोमीटरचा आणि हे अंतर वारकरी मोठ्या आनंदाने पार करतात. केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीने. वारकरी पांडुरंगा कडे जातो पण मुखी नाम ज्ञानेश्वर माऊलींचे तुकारामांचे असते. आपण सामान्य माणसं आपल्या दुःखांचा खूप बाऊ करतो , परंतु विचार केला की आपल्याला जाणवतं की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज , जनाबाई यांच्यापुढे दुःखा पुढे आपली दुःख म्हणजे काहीच नाही. संत रामदास म्हणतात, सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ देव हा आपल्या सर्वांच्या जवळच असतो किंबहुना तो आपल्या आतच आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना आपण कसे सामोरे जातो, आपण किती धारिष्ट दाखवतो हे तो पहात असतो। आणि या सामान्य जीवनाच्या पलीकडे असलेल्या कैवल्याची आस बाळगून,त्याच्या दिशेनी जराशी झेप घ्या, तो श्रीरामराया भक्ताची कधीच उपेक्षा करणार नाही। संत आपल्याला दुःखाकडे त्रयस्थ पणे पहायला शिकवतात. सामान्य माणसे आणि संतांमध्ये असा फरक आहे की जे मिळाले आहे ते संत स्वीकारतात. आनंद असो अथवा दुःख ते ईश्वरचरणी अर्पण करतात. खूप छान उदाहरण देऊन त्यांनी हे समजावून सांगितले. सर्वसामान्यांचा संसार म्हणजे आंब्याची कोय आणि संतांचा संसार म्हणजे चिकूची बी. चिकूची बी चिकू मध्ये असून सुद्धा पूर्णपणे वेगळी असते आणि आंब्याची कोय कितीही साफ करा तरीसुद्धा त्याला आंबा म्हणजेच मोहमाया चिकटलेलीच रहाते. सामान्य माणूस परिस्थिती नुसार मनस्थिती निर्माण करतो तर संत "मनस्थिती नुसार परिस्थिती निर्माण करतात". असे हे संत साधू म्हणजे कोण तर ज्यांचे षट्विकार (काम क्रोध,लोभ, मद मोह मत्सर) धुतले गेले आहेत. तर संतांचे गाव, जिथे प्रेम आहे, कृतज्ञता आहे, वात्सल्य आहे, मायेचा ओलावा आहे, अश्या संतांच्या गावाला (त्या मनाच्या अवस्थेत) जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।