Ram mandir nirman : allokik anubhav

Meeting Details

Meeting Date 15 Jul 2024
Meeting Time 07:30:00
Location Arkey Hall , Prabhat Road
Meeting Type Regular
Meeting Topic Ram mandir nirman : allokik anubhav
Meeting Agenda Speech by chief guest
Chief Guest Ashiwini Kavishwar
Club Members Present 30
Minutes of Meeting 15 जुलै ला आपल्या क्लबमध्ये *अश्विनी कवीश्वर* ही एक हुशार, प्रतिभावान आणि संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा असे महान, पवित्र कार्य करण्याची संधी मिळालेली अत्यंत भाग्यशाली मुलगी तिचे अनुभव कथन करण्यासाठी आपण आमंत्रित केली होती. आपले सचिव रोटे सचिन जोगळेकर ची ती शाळा मैत्रीण. तिला क्लब मध्ये बोलावल्याबद्दल सर्वप्रथम सचिन चेच आभार मानायला हवे. राम मंदिर कार्य सुरु असताना, झाल्यावर आणि अजूनही त्या संबंधी अनेक बातम्या कानावर पडत होत्या, आपण अनेक ठिकाणी अजूनही बघतो, वाचतो. पण यामागची तयारी, त्याचा इतिहास आणि आजपर्यँत फारश्या कोणालाच माहित नसलेल्या आणि गुप्त ठेवण्यात आलेल्या अनेक किस्से, कहाण्या अश्विनी कडून ऐकायला मिळाल्या. त्या अद्भुत होत्या. अश्विनी राम मंदिर निर्माण कार्यासाठी निवडली गेली होती ती *Infra Structure Development - इंजिनीरिंग मॅनेजर* या पदासाठी. ती स्वतः अयोध्येत राम मंदिराच्या कामात जातीने लक्ष घालत होती त्यामुळे एकेका दिवसाचे वर्णन तिच्याकडून ऐकताना सर्वांचे डोळे आश्चर्याने लकाकत होते. बाबरी मशीद 1528 साली मुघल सम्राट बाबर याच्या काळात बांधली होती. त्याच्या काळात अनेक खडतर लढाया झाल्या. नंतर ही चालूच होत्या. 1934 पर्यंत 76 लढाया झाल्या. नंतर न्यायालयीन लढाई झाली कारण हिंदूंचा देव श्रीराम याच्या जन्मभूमी वरील मंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली. या जागेत श्रीराम मंदिर होते याचे अनेक पुरावे, भग्न आवशेष न्यायालयाला मिळाले आणि 8 नोव्हेंबर 2019 ला हे सिद्ध झालं की संपूर्ण जमीन ही राम जन्म भूमी आहे आणि आता हे निर्माण कार्य आहे. त्यानंतर राम मंदिर निर्माण कार्याची घोषणा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केली. *मंदिर भव्य बनाएंगे* या घोषणेतून एक महान वास्तू जन्माला येणार होती. पण तितक्यात कोरोना चे संकट आले. जमिनीत सापडलेले अवशेष आणि राम लल्ला च्या काही भग्न मूर्तिचे अवशेष तात्पुरते *अस्थायी मंदिरात* हलवले गेले. हळूहळू पाहणी होत होती, चाचण्या होत होत्या. शरयू नदी च्या काठावरच हे बांधकाम आहे हे सिद्ध झालं. कायदेशीर बाबी पार पडल्या. 5 ऑगस्ट 2021 ला भूमिपूजन झाले. मोदीजींनी त्यांच्या भाषणातून त्यांचं स्वप्न सांगितलं. भारतीय कला कौशल्य आणि प्राचीन इतिहास यांचं दर्शन या मंदिराच्या उभारणीतून व्हावे, भारतीय अर्थ व्यवस्थेला चालना मिळावी आणि महत्वाचे म्हणजे शांततेचा संदेश देणारे असावे. एकूण 76 एकर जमिनीपैकी 18 एकर वर राम मंदिर बांधले आहे. रा स्व संघ, विश्व हिंदू परिषद यांचेही यात योगदान होते. या मंदिराच्या उभारणी साठी लागणारे साहित्य, अखंड वीज, पाणी, फाउंडेशन साठी लागणारे ग्रानाईट इतकेच नव्हे तर CRPF चे 2700 जवान या कामासाठी उभे होते. अतिशय गुप्तता पाळली जात होती कारण प्रसार माध्यमाना याचा पत्ता लागू द्यायचा नव्हता. अश्या अनेक खडतर दिव्यांतून राम मंदिर उभे राहिले हे आपल्याला माहीतच आहे. अश्विनी कडून एकेक घटना ऐकताना कौतुक, आश्चर्य, अभिमान, आनंदाश्रू, गहिवर अश्या अनेक भावना दाटून आल्या होत्या. तिच्या भाषणात तिने खास नमूद केले की 24/7 काम करण्यासाठी घरातले सर्व, नातेवाईक, शेजारपाजारी, मित्र मैत्रीण यांनी कमालीचे सहकार्य केले त्यामुळे मनात दुसरा कोणताही विचार न येता एकाग्र पणे तिला या कामावर लक्ष केंद्रित करता आले.. अश्विनी, तुझे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. एक पारमार्थिक कार्य पार पडल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर आम्हांला दिसला.. ll जय श्रीराम ll