काश्मीर एक अनुभव

Meeting Details

Meeting Date 12 Aug 2024
Meeting Time 19:30:00
Location Online
Meeting Type Regular
Meeting Topic काश्मीर एक अनुभव
Meeting Agenda Weekly Meeting Topic काश्मीर एक अनुभव
Chief Guest Dr. Pratibha Athavale
Club Members Present 40
Minutes of Meeting काश्मीर एक अनुभव सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 24 रोजी डॉक्टर प्रतिभा आठवले यांचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. प्रतिभाताई या डेंटिस्ट आहेत. सेवाभारती, विवेकानंद केंद्र अश्या अनेक सेवाभावी संस्थांमधून त्यांनी समाजासाठी भरपूर काम केलेले आहे. सैन्यदलाबरोबर काश्मीरमध्ये डेंटल कॅम्पस आयोजित केले गेले त्यामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. याबाबतचे काश्मीरमधील अनुभव त्यांनी या कार्यक्रमात कथन केले. प्रतिभाताईंना महाराष्ट्र शासनाचा तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी आपल्या अनुभवांवर लेखनसुद्धा केलेले आहे. सुरुवातीला त्यांनी काश्मीरमधील गुरेझ व्हॅली आणि उरी येथील अनुपम निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले. गुरेझ व्हॅली 2022 पर्यंत आतंकवादामुळे बंद होती. नंतर ती पर्यटकांसाठी खुली केली गेली. काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाचे काम केवळ पाकिस्तान सैन्याशी आणि स्थानिक आतंकवाद्यांशी लढणे हेच नव्हते तर स्थानिक लोकांना जिंकून घेणे हे सुद्धा होते हे त्यांनी विशद केले. किंबहुना हेच "मिशन सद्भावना" या नावाने सुरू केलेले काम अतिशय अवघड होते. या योजनेच्या अंतर्गत स्थानिकांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, व्यवसायात मदत करणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, इतकेच काय घरातील दुरुस्तीची कामे करणे इ. कामे देखील सैन्यादलांनी करायला सुरुवात केली. मुल्ला-मौलवींच्या प्रभावाखाली असलेल्या स्थानिक लोकांचा भारतीय सैन्यदलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय पूर्वग्रहदूषितच नव्हे तर hostile म्हणता येईल असा होता. त्यामुळे सैन्यदलाला किंचितही सहकार्य करण्यास स्थानिक काश्मिरी नकार देत असत. त्यामुळे सुरुवातीला प्रतिभाताईंनादेखील सैन्यदलातील समजून या लोकांनी सहकार्य केले नाही. पण हळूहळू प्रतिभाताईंची समर्पित सेवा बघून त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. कामाच्या निमित्ताने प्रतिभाताई काश्मीरमधील अनेक संवेदनाशील भागात गेल्या. तिथे कामाच्या निमित्ताने त्यांनी लोकप्रशिक्षणसुद्धा करायला सुरुवात केली. अवतीभोवती सैन्यदल व आतंकवादी यांच्यातील चकमकी, आतंकवाद्यांचा आसपास वावर अश्या अवघड परिस्थितीत लोकसेवेचे काम करणे फार जिकिरीचे आणि धोक्याचे होते. ते ही त्यांनी केले. हळूहळू त्यांनी लोकांचा विश्वास कसा जिंकला ते त्यांनी अनेक अनुभवांच्या माध्यमातून सांगितले. धार्मिक समजुतीमुळे मुलांची प्रचंड पैदास करणाऱ्या बायकांना संतती नियमनाबद्दल सांगणे हे मोठ्या धोक्याचे होते. मौखिक शुद्धतेपासून सुरू करून मोठ्या हिकमतीने त्यांनी लैंगिक शिक्षणापर्यंत मुलांना ज्ञान दिले. आणि त्यांच्याकडून २१ वर्षानंतर लग्न करण्याची व दोनपेक्षा जास्त मुले न होऊ देण्याची शपथ घेववली. काश्मिरी मुलांकडून "भारतमाताकि जय" अशी दणदणीत घोषणा तीन वेळा देववून घेतली त्यावेळी सैन्यदलातील अधिकाऱ्याने सुद्धा "हे काम आम्हालासुद्धा कधी जमले नाही" अशी पोचपावती दिली. शेवटी एका काश्मिरी सरपंचाने त्यांना भेट म्हणून तिरंगा दिला ती त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट होती असे म्हणून त्यांनी आपल्या अनुभवकथनाचा समारोप केला. काश्मिरी लोकांची मानसिकता हळूहळू बदलू लागली आहे. पण तो पूर्ण बदलण्यास दोन पिढ्या तरी जाव्या लागतील असे त्या म्हणाल्या. जवळपास १ तास चाललेला हा कार्यक्रम अतिशय उत्कंठावर्धक आणि रोमांचकारी ठरला. भारतीय सैन्यदलाबद्दल असणारा आदर द्विगुणित झाला. दीपा साठे हिने त्यांची ओळख करून दिली आणि शेखर यार्दी याने शेवटी आभार मानले.