Magic of Rotary

Meeting Details

Meeting Date 26 Aug 2024
Meeting Time 07:30:00
Location Arkey Hall , Prabhat Road
Meeting Type Regular
Meeting Topic Magic of Rotary
Meeting Agenda Rotary moments followed by changes in Rotary and guidance for membership
Chief Guest PDG Mohan Palesha
Club Members Present 25
Minutes of Meeting 6 ऑगस्ट रोजी, आपल्या क्लबने मेंबरशिप महिना निमित्ताने पास्ट डिस्टिक गव्हर्नर मोहन पालेशा यांना वक्ता म्हणून बोलावले होते. हा महिना मेंबरशिप महिना आहे. मेंबरशिप कमिटीमध्ये आपण ठरवले होते की मेंबरशिप ड्राईव्हसाठी अतिरिक्त माहिती देणे आवश्यक आहे. क्लब सदस्यांना आवाहन करण्यासाठी उत्कृष्ट वक्ता बोलावून थोडी माहिती दिली तर आपल्या बऱ्याच शंकांचा निवारण होईल आणि त्याचे महत्व स्पष्ट होईल. PP उज्वल मराठे आणि प्रेसिडेंट डॉक्टर भारती डोळे यांनी मोहन पालेशा यांना भेटून आपल्या क्लबमध्ये येण्याचा आग्रह धरला. उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची ख्याती सर्वांना माहित आहे. संदीप तपस्वी यांनी त्यांची ओळख करून दिली आणि PDG मोहन पालेशा यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात एका सुंदर कवितेने केली. ती कविता इतकी प्रभावशाली होती की, नंतर आपल्या सर्व सदस्यांनी ती ग्रुपवर शेअर करण्याची मागणी केली. जर तुम्ही चुकून वाचायची राहिली असेल तर नक्की वाचा. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे असे होते: • 1980 ते 1995 या काळात रोटरीच्या मेंबरशिपसाठी चांगले दिवस होते आणि त्या काळात मेंबरशिप सुमारे 12 लाख होती. त्यानंतर, मेंबरशिप 12 लाखांवरच स्थिर राहिली आहे. • 1989 मध्ये लेडी मेंबरशिप सुरु झाली आणि आजच्या घडीला तीन लाख महिला सदस्य आहेत. महिला सदस्य घेतल्या नसत्या तर मेंबरशिप 9 लाखांवर असती. • त्यांनी रोटरीच्या इमेजबद्दल विचार व्यक्त केले आणि स्पष्ट केले की, रोटरीची इमेज सुधारण्यासाठी योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. • जुन्या जाणत्या रोटेरिअन्सनी नवीन मेंबर्सना पुढे नेण्याची गरज सांगितली त्यांनी प्रेसिडेंट असताना दिव्यांग मुलांकरता केलेल्या एका प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगितली.. त्या प्रसंगाचं त्यांनी इतकं हुबेहूब वर्णन केलं की अगदी आपण त्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बघतो आहे असेच वाटलं आणि अंगावर काटा आला. ते म्हणाले की हे असे रोटरी मोमेंट्स आपल्याला तयार केले पाहिजेत, त्याच्यामुळे आपण खरेखुरे हाडाचे रोटेरियन बनतो. त्यांनी सांगितले की, असे रोटरी मोमेंट्स तयार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण खरे रोटेरियन बनू शकतो. गेल्या पंधरा वर्षांपासून, जगातील चारिटी नेवीगेटर या संस्थेने रोटरी ट्रस्टला 5 पैकी 4 पेक्षा अधिक रेटिंग दिले आहे. PP ऋजुता देसाई यांनी समर्पक शब्दात आभार मानले. चला तर मग, तर आपण ह्या चांगल्या मार्गदर्शनचा फायदा घेऊया आणि क्लब मध्ये नवीन मेंबर्स आणण्याचा प्रयत्न करूया. वैशाली तपस्वी