20-10-2019 - 20-10-2019

आपण एखादे नाटक ,सिनेमा पाहत असताना नेहमी म्हणतो कि समोर काम करणाऱ्या कलाकारांच्या बरोबर पडद्या मागे काम करणाऱ्या कालाकारांचाही त्या कला कृतीत मोलाचा वाटा असतो . हा पडद्यामागचा कलाकार बऱ्याचदा अप्रकाशित असतो. स्टेजवरच्या कलाकारासारखी प्रसिद्धी सहसा त्याला लाभत नाही. परंतु त्याचं काम मात्र तितकंच महत्वाचं आणि मोलाचं असत . यामध्ये तंत्रज्ञ,साऊंड इंजिनियर्स ,सेट डिझायनर्स ,मेक अप ,लाईट मन इत्यादी अनेक प्रकारचे कलाकार कार्यरत असतात . आपण दरवर्षी जे Vocational Award देतो ते यंदा अशा back stage Artist ला द्यावं असं ठरवलं. त्याप्रमाणे हे Award आपण भरत नाट्य मंदिर मधील दोन पडद्यामागच्या कलाकारांना देऊन सन्मानित केलं . त्यातले विट्टल हुलावळे हे गेली ४३ वर्ष भरतच्या सेवेत आहेत या ४३ वर्षात त्यानी आजच्या घडीच्या अनेक कलाकारांना लहानाचे मोठे होताना पहिले आहे. व्यावसायिक नाटक असो किंवा पुरुषोत्तम स्पर्धा असो ते आजही तितक्याच उत्साहाने स्टेजच्या मागे मदत करत असतात दुसरे श्री रामा धावरे हे हि गेली २१ वर्ष भरत मध्ये काम करत आहे त्यांच्या नावाप्रमाणेच कलाकाराला ,दिग्दर्शकाला काही अडचण आली कि हा राम लगेचच धावून येतो आपल्या एकांकिका समारोपाच्या दिवशी दि . २०/१०/१९ रोजी डी जी रवी धोत्रे यांच्या हस्ते आपण त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले व रोख पाच हजार रूपयांचा चेक दिला. - रो. शिरीष क्षीरसागर

Project Details

Start Date 20-10-2019
End Date 20-10-2019
Project Cost 12000
Rotary Volunteer Hours 16
No of direct Beneficiaries 2
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area