03-03-2020 - 03-03-2020

दि. 3 मार्च 2020, रोटरी क्लब ऑफ ऑफ पुणे युनिव्हर्सिटी व रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर व विद्या महामंडळ संस्थेचा मूक बधीर विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आपटे प्रशालेमध्ये सर्व दिव्यांग शाळा/ कार्यशाळा मधील शिक्षक, निर्देशक ,वाचा उपचार तज्ञ ,social worker यांच्या साठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली होती. रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर गेली ५ वर्षे शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करत आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पुणे विद्यापीठ येथील समुपदेशक आले होते. कार्यशाळा 10.30 ते 4.30 पर्यंत झाली. सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र व माजी डिस्क्ट्रीक्ट गव्हर्नर दीपक शिकारपूर यांचे "दिव्यांगमित्र संगणक" हे पुस्तक देण्यात आले. या पुस्तकांची Royalty PDG दीपक शिकारपूर यांनी घेतली नाही. या उपक्रमाचा फायदा आज पुण्यातील ४० शिक्षकांनी घेतला. अर्चना राठोड आणि आसावरी बापट ह्या समुपदेशकानी अत्यंत सुन्दर मार्गदर्शन केले.

Project Details

Start Date 03-03-2020
End Date 03-03-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 12
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy