13-12-2019 - 13-12-2019

Modern कॉलेज roteract मध्ये – गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी रोटरी / महापालिका ह्यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या “सागरमित्र अभियान प्रकल्प” कार्यशाला घेण्यात आली. एकूण २०० मुलांनी त्यात सहभाग घेतला. ५ वी ते ९वी मधील विविध शाळांमधील विद्यार्थी मित्रांमध्ये पर्यावरण जागरूकता (विशेषतः प्लास्टिक कचऱ्या) निर्माण करण्यासाठी हा सागरमित्र प्रकल्प आहे. जगभरातील सर्व देशात प्लास्टिक कचरा जमा होतो (विकसित देशात तर भारताच्या चौपट). ह्यातील जवळ जवळ 30 टक्के कचरा जमिनीवरून पाण्यात, तेथून नदित आणि नंतर समुद्रात जाऊन जमा होतो (पुण्यातील असा कचरा मूठ, भीमा , कृष्णा नदीमार्गे बंगाल च्या उपसमुद्रात जमा होत आहे) सर्व जगभरातील प्लास्टिक कचऱ्यामुळे ५ उकिरडे समुद्रात तयार झाले आहेत, 2000 km लांब, 80 km रुंद आणि 30 फूट खोल असा हा प्लास्टिक उकिरडा बंगाल च्या उपसमुद्रात आहे. साहजिकच त्यामुळे अनेक मासे प्रजाती नष्ट झाल्या आहेत, पाणवनस्पती नष्ट झाल्या आहेत ह्या जटिल प्रश्नाचे उत्तर अजून पर्यंत तर कोठल्याही देशात सापडलेले नाही, पण आपण स्वतः पासून सुरवात करून शालेय मुलांमध्ये प्लास्टिक पुनरवापर ही जागरूकता निर्माण करायला हवी. कोरडे, रिकामे आणि स्वच्छ प्लास्टिक साठविण्यासाठी विद्यार्थांनी दररोज सवय लावून घ्यायची आहे, हा फक्त आपल्या घरातील प्लास्टिक कचरा दर महिन्यातील एका दिवशी शाळेत जमा करायचा आहे. घरी साठवा, शाळेत पोहोचवा, प्लास्टिक गोळा करणारी संस्था शाळेला ह्या प्लॅस्टिक कचऱ्याचा योग्य मोबदला देईल. ह्या मोबदल्याचा कसा उपयोग करायचा ते विदयार्थी सभा ठरवेल. -प्रे अंजली रावेतकर

Project Details

Start Date 13-12-2019
End Date 13-12-2019
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 800
No of direct Beneficiaries 200
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy