02-10-2019 - 02-10-2019

मानवी आयुष्य व्यापून टाकणाऱ्या विज्ञान, धर्म व तत्वज्ञान ह्या विषयावरची पाचवी ' संसद ' एम. आय. टी.च्या लोणी-राजबाग येथील विश्व शांती केंद्राच्या शांती घुमटामध्ये नुकतीच म्हणजे २ ते ४ ऑक्टोबर २०१९ ह्या काळात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडली. ह्या संसदेच्या उदघाटन प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून थोर दानशूर, संस्कृतचे विद्वान , कवी आणि माजी केंद्रीय मंत्री पदमभूषण डॉ. करणसिंग लाभले होते. त्यांच्या बीजभाषणाचा विषय होता परस्परांच्या धर्माबद्दलच्या आदर आणि विश्वासातून विश्वशांती. ह्यावेळी थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व संगणक तज्ज्ञ, माहिती व तंत्रज्ञान विषयाचे अग्रणी डॉ. विजय भटकर सुद्धा उपस्थित होते. परस्पर सामंजस्य व विश्वशांती हा आपल्या रोटरी इंटरनॅशनलने ठरवलेल्या व ज्यासाठी रोटरी विशेषत्वाने प्रयत्न करते अशा सहा विषयांपैकीच पहिला विषय आहे. आपल्या क्लबमधील पी. पी. प्रदीप वाघ ह्याने त्याच्या अध्यक्षीय वर्षात ' इंटरनॅशनल पीस सिम्पोझिअम ' क्लबच्या वतीने भरवून त्याला रोटरी फाउंडेशनचे ट्रस्टी अमेरिकेहुन मुद्दाम बोलावले होते. प्रदीपचा तेव्हापासूनच ह्या विषयात रस असल्यामुळे ह्या संसदेमध्ये त्याने ' विज्ञान आणि अध्यात्म 'ह्या विषयावरील एक निबंध सादर केला . सुरवातीलाच प्रदीपने ह्या विषयाबद्दल असलेला मर्यादित दृष्टिकोन,ज्ञान ह्याची आपल्याला जाणीव आहे असे सांगून आपल्या वैयक्तिक अनुभव व अभ्यासावर मी बोलणार असल्याचे सांगितले.त्यासाठी त्याने ' विज्ञान व अध्यात्म -अनाहत वैश्विक ज्ञान ' असे त्याचे नामकरण केले. त्याला कारण घडलेला प्रसंग. जीनोम म्हणजे प्राणिमात्रांच्या जीन्सचा सखोल अभ्यास करणारी शाखा. ह्याच्या एका संशोधकाशी बोलताना प्रदीपने जेव्हा त्याला विचारले कि विज्ञानाला जिनॉमच्या संशोधनाअंती काय सापडेल तेव्हा त्या संशोधकाने उत्तर दिले कि विज्ञानाला काय सापडेल ते मला माहित नाही पण मला सापडलेले उत्तर आहे जीन ओम ( आपल्या ओंकारातला ओम ) हे विश्व निर्माण होण्यापूर्वी जो एक अनाहत नाद होता, जे नादब्रह्म ओंकारस्वरूप होते, त्यांचा आणि जीन्सचा हा असा संबंध आहे आणि त्यामुळे प्रदीपला अंतर्यामी कुठेतरी असे जाणवले कि विज्ञान व अध्यात्म हे त्या एकाच अखंड ,अनाहत अशा वैश्विक ज्ञानगंगेच्या प्रवाहाचे भाग आहेत. आपला हा विचार तेथील विद्वद्जनांपुढे मांडून ह्यावर अधिक चर्चा व्हावी असे आवाहन केले. त्याने ह्याच्या पुष्ट्यर्थ काही मराठी व इंग्लिश कविताही उधृत केल्या. आपली ह्या विषयातील गोडी व प्रगती हि केवळ गुरुकृपेमुळे आहे हे सांगावयासही तो विसरला नाही. शरद डोळे, श्रीकांत व शोभना आणि आनंद नवाथे प्रत्यक्ष उपस्थित होते. प्रदीपबद्दल अभिमान वाटला आणि एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवून आम्ही परतलो. - Rtn Anand Nawathe

Project Details

Start Date 02-10-2019
End Date 02-10-2019
Project Cost 0
Rotary Volunteer Hours 48
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution